
®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : उल्हासनगर परिमंडल ४ मध्ये अनेक महत्वाच्या ठिकाणी शहरातील रस्त्यालगत, चौकांमध्ये आणि इतर मोक्याच्या ठिकाणच्या जागा चायनीज सह खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी बळकावल्याचे चित्र दिसून येत आहे. रात्र होताच रस्त्यावर फास्टफूड विक्रेते, चायनीज सेंटर यांच्या गाड्यालागत आहेत. पहाटेपर्यंत चालणाऱ्याया हातगाड्यांवर होणाऱ्या गर्दीत रस्तादेखील अडवला जात आहे. तसेच या ठिकाणी मद्यविक्री सुद्धा करण्यात येत असल्याने अशा फेरीवाल्यांवर पोलिसांसह महापालिकेच्या पथकाने ही नियमित कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
महापालिका अधिकाऱ्यांच्या उदासीनते मुळे शहरात अनधिकृत फेरीवाल्यांचा शिरकाव झाला आहे. शहरातील, शहराबाहेरील व्यक्तींकडून दिवसा, रात्री हातगाड्यामांडून, पदपथावर ठाम मांडून व्यापार केला जात आहे. त्यात उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांची ही मोठीभर पडली आहे. रस्त्यांवरच सिलिंडर मांडून खाद्यपदार्थ शिजवून विकले जात आहेत. त्या मध्ये अंडा पाव, फास्टफूड, चायनीज, तसेच इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा समावेश आहे. यामुळे सिलिंडरच्या स्फोटाच्या, आगीच्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय उघड्यावर शिजवल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांमुळे आरोग्याचा ही प्रश्ननिर्माण होत आहे त्याच प्रमाणे अनेक ठिकाणी बेकायदामद्यविक्री सुद्धा सर्रास सुरु आहे.
काही गाळ्यांमध्ये सुद्धा चायनीज सेंटर मध्ये विनापरवानामद्य विक्री होत असल्याने या चायनीज गळ्यावर राज्यउत्पादन शुल्कपथकाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे. मध्यंतरी उघड्यावर, रस्त्यांवर सिलिंडर वापरून व्यवसाय करणाऱ्यांवर पोलिसांकडून अधून-मधून कारवाई केली जात होती. मात्र, त्यात ही एकीकडे कारवाई केली जाते. तर दुसरीकडे कानाडोळा केला जातो. यामुळे काही ठिकाणी रात्रीच्या वेळी व्यावसायिकांच्या सोयीची ठरत आहेत. अशा सर्वच ठिकाणी कारवाईची विशेष मोहीम राबवली जाण्याची गरज आहे. अनके वेळा अशा ठिकाणी रात्री-अपरात्री नाबालिक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्यादेखील जमत आहेत. त्यांच्यात हाणामारीच्या घटना देखील या पूर्वी घडलेल्या आहेत. तरी अश्या चायनीज सेंटर व खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.