
®अधिवेशन वृतसेवा, कोल्हापूर : कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुरगूड पोलीस ठाणे हद्दीत अर्जुननगर अर्जुनी ता. कागल जिल्हा कोल्हापूर येथे धनश्री कला, क्रिडा सांस्कृतीक व मनोरंजन या मंडळाचे येथे येवुन रितसर पहाणी करुन तेथे सुरु असलेला पैसे लावुन पत्याचे पानाचा जुगार हा बेकायदेशिर सुरु असल्याची खात्री झाल्याने आम्ही कायदेशिर कारवाई करत असताना सदर व्यवसायाचा मुळ मालक अमर शिवाजीराव चव्हाण यादवनगर ता. कागल जि. कोल्हापूर याने मी पोलीस महासंचालक यांचेकडुन परवाना घेतलेला आहे. मी वेळावेळी पोलीस अधीक्षक यांना भेटलेलो आहे. मी तुमची तक्रार करणार आहे. मी तुम्हाला सोडणार नाही, मी तुमचे विरुध्द तक्रार करतो. माझेकडे पोलीसांनी येथे प्रवेश करायचा नाही असा न्यायालयाचा आदेश आहेत, तमच्यावर कन्टेम्पट ऑफ कोर्ट दाखल करतो असा धाक दाखवून हुज्जत घालुन त्याने आरडा ओरडा सुरु करुन सरकारी कामामध्ये त्याने व्यत्यय निर्माण केला आहे आयपीसीच्या कलम १८६ व ३५३ अन्वये एफ आय आर नोंदवली मुंबई उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदविले की, FIR आणि आरोपपत्रातील आरोपांचा विचार करता, आम्हाला याचिकाकर्त्याच्या वकीलाच्या युक्तीमध्ये प्राथमिक स्वरूपात तथ्य आढळते की, केवळ ओरडल्याने IPC च्या कलम ३५३ अंतर्गत गुन्हा सिद्ध होणार नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यावरील आयपीसी च्या कलम ३५३ अंतर्गत झालेला एफ आय आर बाबत खालील न्यायमूर्ती. सारंग व कोतवाल आणि स.म मोडक आणि यांच्या खंडपीठाने “CRIMINAL WRIT PETITION NO.6114 OF 2024” सुनावणीस स्थगिती निर्णय घेतला की पोलीस अधिकाऱ्यास ओरडून बोलल्याने आयपीसीच्या कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल होऊ शकत नाही. ★★★★★