पोलिसांनी ऑन-ड्युटी फेसबुक-इन्स्टा रील बनवल्यास होणार कडक कारवाई

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : सध्या संपूर्ण जगभरात लोकाचे सोशल मीडिया वापरण्याचे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. प्रत्येक जण फेसबूक, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विडिओ, रील, आणि फोटो अपलोड वापर करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी आपले पोलिस बांधव देखील या गोष्टीचा वापर करून प्रसिद्धी मिळवत असतात.
परंतु या प्रकरणी पोलिस अधीक्षक, ठाणे ग्रामीण चे डॉ. डी. एस. स्वामी यांनी जा.क्र./४०५/सोशल मीडिया/रीलस/३८१/२०२५ पत्रांनुसार ठाणे ग्रामीण घटकातील सर्व पोलिस अधिकारी/ठाणे अमलदार यांना ऑन-ड्युटी फेसबुक-इन्स्टा रील बनवण्यास बंदी घालण्या बाबत आदेश जारी केला आहे. आदेशाचे उलंघन केल्याचे निदर्शनास आल्यास संबधित विरुद्ध योग्य ती कडक विभागीय कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे.
बंदी घालण्याचे मुख्य कारणे काय ?
पोलिस ऑन-ड्युटी असताना मोबाइलवर गप्पा मारण्यात किवा रीलस बनवण्यात गूतलेले असतात. त्यामुळे ते कर्तव्यात १००% योगदान देत नाही. वाहन तपासणी सारख्या संवेदनशील कामातही पोलिस कर्मचारी गुंतलले असतात. तसेच सरकारी चार चाकी वाहन, शस्त्रे, हातकडी, याचा वापर करत विडिओ बनवून सोशल मिडियावर अपलोड करत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे जनसामान्यात चेष्टाचा व उपहासाचा विषय झाला आहे. त्यामुळे सर्व अधिकारी कर्मचारी यांना सदरचा आदेश सतत ३ दिवस हजेरीवर वाचून आपले हाताखालील अधिकारी/ठाणे अमलदार याचे निदर्शनास आणून कडक अंमलबजावणी करावी असे आदेशात म्हटले आहे. ★★★★★

Scroll to Top