
®अधिवेशन वृतसेवा, मुंबई, 05 जून 2025 – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे 126 वी मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. या बैठकीस मध्य रेल्वेचे महाप्रबंधक मा. श्री. धर्मवीरजी मीणा यांनी अध्यक्षस्थान भूषवले.
या बैठकीत क्षेत्रीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य श्री. अजितसिंग आर. रावत यांनी सक्रिय सहभाग घेत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा घडवून आणली. त्यांनी विशेषतः दिव्यांग (अपंग) रेल्वे प्रवाशांच्या अडचणी, सुविधांचा अभाव व त्यांच्या दैनंदिन प्रवासाशी संबंधित समस्यांवर सविस्तर मागण्या मांडल्या.
श्री. रावत यांनी प्लॅटफॉर्मवर दिव्यांगांसाठी रॅम्प्स, लिफ्ट, वॉशरूम्स, आणि विशेष सहाय्यकांची गरज अधोरेखित करत, त्यांच्या सुरक्षित व सुलभ प्रवासासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी केली.
बैठकीत उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांनी या मागण्यांची नोंद घेत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच यासंबंधी पावले उचलली जातील, असे संकेत दिले गेले आहेत.