विठ्ठलवाडी पुल दुरुस्तीमुळे 10 फेब्रुवारीपासून वाहतूक बंद; पर्यायी मार्ग जाहीर

®अधिवेशन वृत्तसेवा, कल्याण : कल्याण कोळशेवाडी वाहतूक उपविभागाच्या अधिसूचना क्र. 22 नुसार विठ्ठलवाडी स्मशानभूमी येथील पुलाचे काम मंगळवार, दि. 10 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 12.00 वाजल्यापासून सुरू होणार असून काम पूर्ण होईपर्यंत या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. संबंधित वाहने स्व. आनंद दिघे उड्डाणपूल मार्गे सम्राट चौकातून इच्छित स्थळी जाऊ शकतील.
पुणे लिंक रोडवरील खेडेगोलवली नाल्यावरून विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन व श्रीराम चौकाकडे जाणाऱ्या तसेच स्व. आनंद दिघे चौक, स्मशानभूमी व श्रीराम चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना या मार्गावरून प्रवेश बंद करण्यात आला आहे.
हलकी वाहने व स्थानिक नागरिकांसाठी पर्यायी अंतर्गत मार्ग पुढीलप्रमाणे: 1. काटेमानवली ब्रिजखालून हनुमान नगर मार्ग, 2. चीचपाडा रोड 3. 100 फूटी रोड नुसार जातील. तसेच कल्याण पूर्व परिसरातील नागरिकांनी कोळशेवाडी किंवा विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याकडे ये-जा करताना वरील अंतर्गत मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पंकज शिरसाठ, पोलिस उपआयुक्त (वाहतूक), ठाणे शहर यांनी केले आहे.

Scroll to Top