प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाकडून तक्रारीवर महत्त्वाची दखल

®अधिवेशन वृत्तसेवा, नवी दिल्ली : प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाने दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी केलेल्या अधिकृत पत्राद्वारे श्री. खुशाल अरविंद विसपुते यांनी दाखल केलेल्या तक्रारीला महत्त्वाची दखल दिली आहे. त्यांनी २८ जानेवारी २०२६ रोजी विविध शासकीय विभागाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांविरोधात ऑनलाइन तक्रार दाखल केली होती.
उक्त तक्रारीत, ‘ग्रामीण पोलिस’ वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या जनहिताच्या बातम्यांकडे संबंधित शासकीय विभागांकडून जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच, या दुर्लक्षामुळे प्रेस स्वातंत्र्यावर परिणाम होत असल्याचे विसपुते यांनी नमूद केले होते.
या पार्श्वभूमीवर प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाने तक्रारीची कायदेशीर चौकशी करण्यास मंजुरी दिली असून, चौकशी प्रक्रियेसाठी एक महत्त्वाचा निर्देश जारी केला आहे. त्यानुसार, जबाबदार शासकीय विभागांनी जनहिताच्या बातम्यांकडे दुर्लक्ष केलेल्या व करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे, पदनामे आणि पत्त्याची माहिती काउन्सिलकडे सादर करण्यास सांगितले आहे.
हे पत्र सस्वती देबनाथ नारिम यांच्या साक्षीने अधिकृतरीत्या जारी करण्यात आले आहे.

Scroll to Top