महाराष्ट्रातील रेशन कार्डधारक लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; आता घरबसल्या E-KYC शक्य

®अधिवेशन वृत्तसेवा, उल्हासनगर : महाराष्ट्रातील National Food Security Act (NFSA) अंतर्गत लाभ घेणाऱ्या नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. Mera E-KYC अ‍ॅप आता सुरू झाले असून लाभार्थ्यांना आता स्वतःची आणि कुटुंबातील सदस्यांची E-KYC घरबसल्या काही मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. यासाठी रेशन दुकानात जाण्याची गरज राहणार नाही. ही प्रक्रिया पूर्णपणे सोपी असून फेस ऑथेंटिकेशन (Face Authentication) च्या माध्यमातून केली जाते. त्यामुळे लाभार्थ्यांचा वेळ वाचणार असून प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार आहे.
E-KYC करण्यासाठी लाभार्थ्यांनी खालील दोन अ‍ॅप मोबाईलमध्ये डाउनलोड करणे आवश्यक आहे.
Mera E-KYC App
Aadhaar Face RD Service App
अ‍ॅप डाउनलोड करून आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनद्वारे KYC प्रक्रिया पूर्ण करता येते.
तसेच ज्या व्यक्तींची RC मशीनवर E-KYC दिसत नाही, त्यांनी मोबाईल अ‍ॅपद्वारे प्रक्रिया करावी. यावेळी संबंधित व्यक्तीसमोर ठेवून प्रक्रिया केली असता मोबाईल नंबरवर OTP येतो आणि त्याद्वारे KYC पूर्ण करता येते.
विशेषतः नवीन रेशन कार्डधारक तसेच ज्यांची E-KYC अजून झाली नाही अशा सदस्यांचीही प्रक्रिया करून घ्यावी, असे शिधावाटप कार्यालय क्र – 40 फ, उल्हासनगर कॅम्प 5 कार्यालयाकडून आवाहन करण्यात आले आहे. E-KYC पूर्ण झाल्यानंतर त्याचा फोटो किंवा नोंद ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

Scroll to Top