
®अधिवेशन वृत्तसेवा, उल्हानगर : महादेव नगर, कॅम्प 4 येथील प्रभाग क्रमांक 15 मध्ये मच्छर व इतर कीटकांचा वाढता त्रास लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडून कीटकनाशक फवारणी करण्यात आली. ही मोहीम स्वच्छता निरीक्षक अनिल सुरेश गायकर आणि त्यांच्या पथकाने राबवली.
या फवारणीमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून आरोग्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वाचा ठरला आहे. काम तत्परतेने पार पाडल्याबद्दल स्थानिक रहिवाशांनी स्वच्छता निरीक्षक अनिल गायकवाड व त्यांच्या टीमचे आभार मानले. तसेच भविष्यातही अशीच नियमित फवारणी करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.