भांडुप पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांचा नागरिकांशी थेट संवादाचा उपक्रम

®अधिवेशन वृत्तसेवा, मुबंई : मुंबईतील भांडुप परिसरात पोलिस-जनता संवाद वाढवण्यासाठी एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. भांडुप पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी नागरिकांशी थेट संपर्क साधता यावा यासाठी आपल्या पोलीस ठाण्याच्या आवारात स्वतःचे नाव व मोबाईल क्रमांक जाहीर केले आहेत.
हा उपक्रम केवळ औपचारिक नसून नागरिकांच्या तक्रारी, सूचना आणि समस्या थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनात पारदर्शकता वाढण्यास आणि जनतेचा विश्वास दृढ होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, नागरिकांनी विक्रोळी पोलीस ठाणे बाबत नाराजी व्यक्त केली आहे. येथील लँडलाईन क्रमांक 022-25782240 वर अनेकदा संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार काही नागरिकांनी केली आहे. त्यामुळे विक्रोळी पोलीस ठाण्याने नागरिकांसाठी नेहमी उपलब्ध राहणारा आणि तात्काळ प्रतिसाद देणारा संपर्क क्रमांक जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.
नागरिकांच्या मते, केवळ संपर्क क्रमांक प्रसिद्ध करणे पुरेसे नसून त्या क्रमांकावर प्रत्यक्ष प्रतिसाद मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. पोलिस दलाबद्दलचा विश्वास हा केवळ अधिकारामुळे नव्हे तर उपलब्धता आणि संवेदनशीलतेमुळे निर्माण होतो.

Scroll to Top