
®अधिवेशन वृत्तसेवा, ठाणे : ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयात RO प्लान्टचे उद्घाटन करण्यात आले असून त्यामुळे अधिकारी, कर्मचारी तसेच कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था उपलब्ध झाली आहे. या उपक्रमामुळे कार्यालयीन परिसरात येणाऱ्या सर्वांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होणार आहे. नागरिकांच्या सुविधा आणि सेवेला प्राधान्य देत ठाणे पोलिसांनी हा सकारात्मक उपक्रम राबविला असून याचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
या सुविधेमुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार असून सार्वजनिक सेवेला अधिक सक्षम बनवण्याच्या दिशेने ठाणे पोलिसांचे हे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.