उत्कृष्ट कार्याचा गौरव; अनिल पडवळ यांना प्रशस्तीपत्र प्रदान

®अधिवेशन वृत्तसेवा, उल्हासनगर : ठाणे शहरातील विठ्ठलवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल सुभद्रा देवराम पडवळ यांना सन 2025 साठी सलग 15 वर्षे गुणवत्तापूर्ण व उत्कृष्ट सेवेबद्दल राज्यस्तरीय सन्मानाने गौरविण्यात आले आहे. मा. आशुतोष डुंबरे (IPS), पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र दिनाच्या (1 मे 2026) निमित्ताने हा सन्मान प्रदान करण्यात आला. या अंतर्गत त्यांना मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पोलीस पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
पोलीस दलात दीर्घकाळ प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल पडवळ यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, त्यांच्या या यशामुळे ठाणे पोलीस दलाचा गौरव वाढला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Scroll to Top