विदेशी, किरकोळ मद्य विक्रीच्या दुकानांसाठी बंद करावयाच्या वेळेत शिथिलता

®अधिवेशन वृतसेवा, मुंबई, दि. 24 : मुंबई दारुबंदी कायदा, 1949 अंतर्गत मुंबई विदेशी मद्य नियमावली 1953 व महाराष्ट्र देशी मद्य नियमावली 1973 अंतर्गत विविध तरतुदीनुसार मुंबई शहर जिल्ह्यातील किरकोळ, विदेशी मद्य विक्रीच्या दुकानांना बंद करावयाच्या वेळेत शिथिलता देण्यात आली आहे. ही शिथिलता दि 24, 25 व 31 डिसेंबर, 2024 पर्यंत देण्यात आली आहे. मुंबई शहराचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
एफएल-2 (विदेशी मद्य किरकोळ विक्रीचे दुकान) रात्री 10.30 ते पहाटे 1 वाजेपर्यंत, उच्च दर्जाची व अतिउच्च दर्जाची श्रेणीवाढ मिळालेल्या एफएल 2 अनुज्ञप्ती यांना रात्री 11.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत, एफएलबीआर -2 आणि एफएलडब्ल्यू -2 यांना रात्री 10.30 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत, एफएल-3 (परवाना कक्ष) एफ एल-4 (क्लब अनुज्ञप्ती) यांना पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रासाठी रात्री दीड ते पहाटे पाच वाजेपर्यंत आणि इतर क्षेत्राकरिता रात्री 11.30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत शिथीलता असणार आहे.
बिअर बार मध्यरात्री 12 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत, वाईन बार मध्यरात्री 12 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत, ई-2 मध्यरात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत शिथीलता असणार आहे. सीएल -3 अनुज्ञप्ती यांना महानगरपालिका तसेच ‘अ’, व ‘ब’ वर्ग नगरपालिका क्षेत्रातील अनुज्ञप्तींसाठी रात्री 11 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत व इतर ठिकाणी रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत शिथिलता असणार आहे. ही वेळेची शिथिलता 24, 25 व 31 डिसेंबर रोजी असेल असे आदेशान्वये मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी कळविले आहे. ★★★★★

Scroll to Top