®अधिवेशन वृतसेवा, पुणे : महाराष्ट्रात गुटखा, सुगंधी पानमसाला, तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आहे. महाराष्ट्र सरकारने जुलै 2012 मध्ये या पदार्थांवर बंदी आणली होती. गुटखा, तंबाखू यांच्यामुळे कर्करोग होऊ शकतो. तंबाखू, गुटखा खाण्याची तलब सुटत नाही, पण प्रयत्न केल्यास यश मिळू शकते. याकरीता पोलीस उपायुक्त कार्यालय परिमंडळ 5, पुणे चे डॉ. राजकुमार शिंदे (भा.पो.से) यांच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाणे कडील अधिकारी व ठाणे अंमलदार यांनी ऑन ड्युटी गणवेशात असतांना किंवा पोलीस दलातील इतर शासकीय कार्यालयात येताना व जाताना आपले जवळ गुटखा / तंबाकू / दारू / सिगारेट बाळगू नये. तसेच कार्यालयत असतांना कुणीही गुटखा तंबाकू खाऊन कार्यालयातील भीतीवर, व इतर परिसरात थूकु नये. ऑन ड्युटी गणवेशावर सिगारेट ओढू नये. कार्यालयातील परिसरात थुकताना आढल्यास संबंधितांवर तात्काळ शिस्त भंगाची 5,000₹ दंडाची कारवाई करण्यात येईल.
तसेच गणवेशावर व ऑन ड्युटी कर्तव्यावर असतांना कुणीही दारू पिउन आढल्यास संबधित अधिकारी व ठाणे अंमलदार यांच्या वर तात्काळ निलंबनाची व कडक शिस्त भंगाची कारवाई ‘जा.क्र. पोउआ./परि-05/वाचक/आदेश पत्र/10619/2024 पुणे शहर’ या लिखित आदेशानुसार कारवाई करण्यात येईल. ★★★★★