®अधिवेशन वृतसेवा कल्याण, दि. 25 : बदलापूरात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार घटनेची पुनरावृत्ती कल्याण पूर्व परिसरातील चक्कीनाका भागात घडलीये. एका 12 वर्षाच्या मुलीचं अपहरण आणि लैंगिक अत्याचार करून भिवंडी तालुक्यातील बापगावात हत्या करण्यात आली. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं कल्याण हादरलं..
या हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधार विशाल गवळीला बुलढाणा जिल्ह्यातील शेगावातून तर त्याची पत्नी साक्षी गवळीला कल्याण शहरातून अटक करण्यात आलीये.. घटनेनंतर कल्याणातील नागरिक आक्रमक झालेत या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांचा निषेध मोर्चा काढला आरोपी विशाल गवळीला फाशीची शिक्षा द्या, बदलापुरप्रमाणे विशाल गवळीचे एन्काऊंटर करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर विशाल कल्याण शहरातून पळून गेला. तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात पोहोचला. या भागात विशालची पत्नी साक्षी हिचे माहेर आहे. त्यानंतर त्यानं कोणी ओळखू नये यासाठी दाढी केली. त्यानंतर पेहराव बदलून तो बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलीसांनी त्याच्यावर झडप घातली. दरम्यान, आरोपी विशालवर याआधीही गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आलीये.
कल्याणच्या नराधमाचं नाव विशाल गवळी असे आहे. त्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या केली. विशाल गवळीविरोधात याआधीही विनयभंगाचे 4 गुन्हे नोंद आहेत. विशाल गवळी हा विकृत स्वभावाचा असल्याचं समोर आलं आहे. विशाल गवळीची आतापर्यंत 3 लग्न झाले आहेत. सध्या तिसऱ्या बायकोसोबत राहतो. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिसऱ्या पत्नीची मदत केली. पत्नीच्या गावी शेगावमध्ये लपलेल्या विशाल गवळीला पत्नीसह बेड्या ठोकल्या आहेत.
बदलापूर असो वा कल्याण शहरं बदलतायत मात्र विकृती तिच आहे. अशा विकृतीला आळा घालण्यासाठी कठोर कायदे आणि त्वरीत न्यायाची गरज निर्माण झालीये..ही विकृती वेळीच ठेचण्याची गरज आहे. विशालसारख्या नराधमांचा लवकरच योग्य निकाल लागेल असा विश्वास संतप्त नागरिकांनी व्यक्त केलायं. ★★★★★