उल्हासनगरात डेंग्यूचे रुग्ण वाढले

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : उल्हासनगर शहरात सध्या धुळीच्या त्रासाने उल्हासनगरवासी आजारी पडत असताना दुसरीकडे डेंग्यू आजाराने डोके वर काढले आहे. याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी नागरिकांची आहे. डास निर्मूलनासाठी औषध फवारणी, स्वच्छ ते मोहीम राबवण्याची गरज असून नागरिकांमध्ये सांडपाण्या विषयी जनजागृतीची गरज आहे.
उल्हासनगर शहरात कँप १ ते ५ मध्ये सरकारच्या अमृत योजने अंतर्ग त भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. सर्व रस्ते खोदल्या मुळे शहराची वाईट अवस्था झाली आहे. सर्वत्र धुळीचे साम्रा ज्य निर्माण झाले आहे. या रस्ते खोदकामामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. त्या तच डेंग्यूचे रुग्ण ही वाढत आहेत. शहरातील झोपडपट्टी सदृश्य भागात डेंग्यूच्या डासांची पैदास वाढत आहे. यावर तात्काळ उपाय योजना करणे आशक्यक आहे. ★★★★★

Scroll to Top