®अधिवेशन वृतसेवा, अंबरनाथ : पोलीस ठाण्यामध्ये गेल्या वर पोलीस चांगली वागणूक देत नाही अशी सर्वसामान्यांची भिती आता दूर होणार आहे कारण डोंबिवबवलीतील एका युवकाने पोलिसांच्या असभ्य वागण्या बाबत ‘राज्य मानवी हक्क आयोगाचे’ दरवाजे ठोठावल्या वर राज्य मानवी आयोगाने महाराष्ट्र पोलिसांना दर महिन्या ला सेमिनार आणि कार्यक्रम घेऊन लोकांशी चांगले आणि मदतपूर्ण वर्तन करण्या चे निर्देश पोलीस महासंचालकाना दिलेले आहेत.
डोंबिवबवलीत रहाणारा केवल विकमणी हा तरुण क्रिकेटचे टर्फ ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात असलेल्या शिवाजीनगर पोलीस ठाणेच्या हददीत चालवित होता. २० मे २०२३ रोजी त्यांच्या टर्फ फ्वमध्ये क्रिकक्रकेटचा सामना सुरु असताना शिवाजीनगर पोलीस ठाणे चे पोलीस उपनिरीक्षक यांनी पोलीस गाडीने आपल्या कर्मचाऱ्यांसह येऊन केवल विकमणीसह सर्व खेळांडूंना शिविगाळ केल्याचा आरोप आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल देखील झाला होता. याबाबत विकमणी यांनी विविध सरकारी विभागात तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारीवर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे केवल विकमणी यांनी अधिवक्ता गणेश घोलप यांच्या मार्फत ‘राज्य मानवी हक्क आयोगाकडे’ तक्रार केलेली होती. त्या तक्रारीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तांसह उल्हासनरचे डीसीपी आणि अंबरनाथचे एसीपी यांचेसह समर्थ पोलीस स्टेशन, पुणे येथे नियुक्तीक्तीस असलेले पोलीस उपनिरीक्षक यांना नोटीस काढून शपथपत्र सादर करण्याचे निर्देश केलेले होते. सुनावणी दरम्यान राज्य मानवी हक्क आयोगाने व्हिडीओ चित्रीकरण, सुहास पाटील यांचे विरोधात झालेली कार्यवाही आदींचे अवलोकन करुन संबंधित पोलीस उपनिरीक्षक यांनी ६ आठवडयात केवल विकमणी यांना ५ लाख रुपये नुकसान भरपाईपोटी द्यावी तसेच त्यां ची खातेनिहाय चौकशी करत त्यांचे विरोधात दोषारोपपत्र सादर करण्याचे निर्देश ठाणे पोलीस आयुक्तंना दिलेत. ★★★★★