डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधी भावूक ; “मी मार्गदर्शक गमावला”

®अधिवेशन वृतसेवा, “डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे मी माझा मार्गदर्शक गमावला आहे. आपल्यासारखे अनेकजण आहेत, जे त्यांना अभिमानाने आपल्या स्मरणात ठेवतील. मनमोहन सिंग यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि समजूतदारपणा दाखवत भारताचे नेतृत्व केले. त्यांना आर्थिकशास्त्राबाबत असलेल्या ज्ञानामुळे भारताला मोठी प्रेरणा मिळाली. मी त्यांच्या पत्नी कौर आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त करतो”, असे राहुल गांधी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.”
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. वयाच्या 92 वर्षी मनमोहन सिंग यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. डॉ. मनमोहन सिंग म्हणजे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ ज्यांनी उदारीकरणाच्या निर्णयाने भारताच्या अर्थव्यवस्थेला बळकट केले. परंतु, त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण भारतावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. राजकारण्यांसह सर्वस्तरावरून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. नुकताच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावरील एक्सवरर पोस्ट करत डॉ. मनमोहन सिंग यांना राहुल गांधी श्रद्धांजली वाहिली आहे. “डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे मी माझा मार्गदर्शक गमावला आहे. आपल्यासारखे अनेकजण आहेत, जे त्यांना अभिमानाने आपल्या स्मरणात ठेवतील, असे राहुल गांधी यांनी लिहिले. • • •

Scroll to Top