
®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : उल्हासनगर परिमंडळ 4 च्या हद्दीत लॉज च्या नावाखाली खुलेआम वेश्या व्यवसाय अजूनही सुरुच आहे. कायम वादग्रस्त असलेले विठ्ठलवाडी पोलीस ठाणे च्या हद्दीत असेलेले लॉज सुर्या लॉज, पूनम लॉज, मध्यवर्ती पोलिस ठाणे च्या हद्दीत असेलेले कोहिनूर, सितारा (ओंमकार), वृंदावन, सेंट्रल पार्क हॉटेल/लॉजमध्ये खुलेआम वेश्याव्यवसाय (सेक्स रॅकेट) सुरू आहे. याकडे वेळीच ठाणे पोलिस आयुक्तांनी विशेष लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. सदर लॉज मध्ये महिला व मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहविक्री करून घेतली जाते. यासाठी परराज्यांतील महिला व मुलींचा सर्रास वापर केला जात आहे. संबंधित लॉज वर लावलेल्या सी.सी.टी.व्ही चा आधार घेत शाहनिशा करत तात्काळ कारवाई करावी. जेणे करून या खुलेआम चालत असलेल्या देहव्यापारावर तात्काळ आळा घालता येईल. ★★★★★