
®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : मुंबई पोलिस पोर्ट झोनचे डीसीपी डॉ. सुधाकर पठारे यांचा आज (दि.२९) कार अपघातात मृत्यू झाला. तेलंगणातील श्री शैलम येथून ते नागरकुरलूनकडे जात होते. यावेळी त्यांच्या कारची आणि ट्रकची धडक झाली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते २०११ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. (DCP Sudhakar Pathare) आज सकाळी ते त्यांच्या एका नातेवाईकासोबत ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. यात दोघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुंबई पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे.
डॉ. सुधाकर पठारे हे एक निष्ठावान आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी होते. सध्या बंदर परिमंडळ मुंबई येथे तसेच यापूर्वी नवी मुंबईत त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांच्या अचानक जाण्याने पोलीस दलात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
या कठीण प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबीयांना, मित्रपरिवाराला आणि सहकाऱ्यांना मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. ॐ शांती ★★★★