आशेळेपाडा येथे दहशत माजवणाऱ्या टोळीतील 2 जण विठ्ठलवाडी पोलिसांच्या ताब्यात

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर दि. ११ : विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशेळेपाडा या ठिकाणी काही नशेखोर तरुणांनी 5 ते 6 जणांवर धारदार शास्त्रने हल्ला करून अनेक गाड्यांची तोडफोड केल्याची घटना मंगळवारी घडली होती. या हल्ल्यानंतर संताप्त झालेले नागरिक रस्त्यावर उतरून पोलिसांना त्यांनी घेरावा घातला होता. या घटनेतील आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी ही नागरिकांनी केली होती. अखेर विठ्ठलवाडी पोलिसांनी रात्रीच्या सुमारास या घटनेतील आरोपींचा शोध घेऊन त्यातील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींचा शोध देखील पोलिसांनी सुरू केला आहे. या सर्व आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. भविष्यात अशा प्रकारे दहशत माजवणारे गुंड निर्माण होणार नाही किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. यासाठी पोलीस ठाण्यात अधिकचा स्टाफ आणि आशेळेपाडा ठिकाणी पोलीस चौकी उभारणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.
या बाबत पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगतिले विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॅम्प नंबर ४ परिसरातील आशेळेपाडा येथे जो प्रकार घडला त्यामध्ये एकूण 4 तरुणांनी हा गुन्हा केला आहे. या संदर्भात एकूण 2 गुन्हे दाखल आहेत. त्यात आम्ही दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या दोन तरुणांकडे विचारपूस करत आहोत. त्यांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्यात येणार आहे. या अगोदर यांनी 3 लोकांना जबर मारहाण करून जखमी केले होते. जवळपास 4 ते 5 फोर व्हीलरच्या काचा त्यांनी फोडल्या होत्या. पोलीस चौकीच्या अनुषंगाने तिथे आम्ही जागा पाहणी आणि स्थानिक लोक आहेत. त्यांच्या मदतीने आम्ही लवकरच पोलीस चौकी उभारणार आहोत. याबाबत वरिष्ठान सोबत चर्चा झालेली आहे. असे डीसीपी सचिन गोरे यांनी सांगितले. या घटनेमध्ये जे तरुण सहभागी आहेत. त्यांच्यावर कडक प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार. शिवाय तिथले स्थानिक नागरिक आणि पोलीस स्टेशन यांचा एकमेकांशी सहभाग आणि कोऑपरेशन राहील याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्या परिसरात जास्तच जास्त पेट्रोलिंग आणि गुन्हेगारांवर कडक नजर पोलिसांची राहणार आहे. आता त्या ठिकाणी कोणतीच अडचण राहणार नाही. नागरिकांनी घाबरू नये. असे प्रकार पुनः घडल्यास 112 कॉल करावे. असे डीसीपी सचिन गोरे यांनी सांगितले.

Scroll to Top