उल्हासनगरवासीयांचे आरोग्य “कबुतर खाण्यामुळे” धोक्यात?

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर – उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील कॅम्प १ ते ५ नंबर पर्यत जागो – जागी कबुतरे  असून त्यांना रोज दाणे धान्य टाकून त्याची संख्या वाढत आहे. तेव्हा याबाबत लक्ष देऊन योग्य कारवाई करण्याची मागणी “एक हाथ मदतीचा”चे अध्यक्ष विजय कदम (बोडारे) यांनी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त  मनीषा आव्हाळे  यांना पत्राद्वारे योग्य ती उपाययोजना करुन तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील काही ठिकाणी कबुतरे याचे ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी जाऊन तेथील काही नागरिक कबुतरे यांना धान्य टाकत असतात. तेव्हा या बाबत तेव्हा या बाबत उल्हासनगरमधील सामाजिक संस्था “एक हाथ मदतीचा”चे अध्यक्ष विजय कदम (बोडारे) यांनी पाहणी दौरा केला असून या मध्ये छत्रपती शाहू महाराज मेन उड्डाणपूल, कॅम्प ४, अनिल गुलाम जाम दुकान, कॅम्प १, साईबाबा मंदिर – ३९ सेक्शन, कॅम्प ५ अशा ठिकाणी हजारोच्या संख्येने कबुतरे आहेत. त्यामुळे विविध अनेक आजार पसरत असल्याचे सिद्ध झाले आहे. याबाबत मा. मुंबई उच्च न्यायलय यांनी सुद्धा यामध्ये आपला निर्णय हि दिला आहे. काबुतरासंबधित रोगांमध्ये श्वसन त्वचा पचन संस्थेचे आजार होत आहेत कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे अनेक नागरिकांना श्वसनाच्या व्याधी व बुरशी जन्य कधीही बरे न होणारे आजार उद्भवत आहेत. त्यामुळे महापालिकेने यावर तातडीची दखल घेऊन प्रतिबंधात्मक उपाय करावे अशी मागणी केली आहे. ★★★

Scroll to Top