
®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर, १५ ऑगस्ट: “हम नहीं डरेंगे” अशा थेट आव्हानात्मक वृत्तीने विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सूर्या लॉजमध्ये पुन्हा एकदा बिनधास्तपणे वेश्याव्यवसाय सुरू झाल्याचे समोर आले आहे. काही दिवसापूर्वीच क्राईम ब्रँचच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने या लॉजवर मोठी कारवाई करत सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केले होते. या कारवाईत दोन असहाय्य मुलींची सुटका करण्यात आली होती, तसेच लॉज मॅनेजरवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तथापि, एवढ्या मोठ्या कारवाईनंतर देखील लॉज व्यवस्थापनाने कोणताही धडा न घेतल्याचे दिसून येत आहे. “हम नहीं डरेंगे” असे म्हणत तेच जुने अनैतिक कृत्य पुन्हा सुरू करण्यात आले असून, परिसरातील नागरिकांमध्ये यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या लॉजवर त्वरित पुनः कारवाई करून ती सील करण्याची मागणी केली आहे.
पोलिस यंत्रणांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अन्यथा अशा बिनधास्तपणे सुरू असलेल्या अनैतिक धंद्यांना आवर घालणे अशक्य होईल, असे मतही काही सामाजिक संघटनांनी व्यक्त केले आहे. ★★★