वास्तव नसेल तर मतदान नाही

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : एखाद्या मतदार प्रभागात घर अथवा रूमची मालकी असून ती भाड्याने दिली असल्यास त्या मालकाला मतदानाचा अधिकार मिळतो का, असा प्रश्न अनेक नागरिकांकडून उपस्थित केला जातो. मात्र Representation of the People Act, 1950 (लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950) तसेच मतदार नोंदणी नियम यानुसार मतदानाचा हक्क हा मालकीवर नव्हे, तर प्रत्यक्ष वास्तवावर आधारित असल्याचे कायद्यात स्पष्ट करण्यात आले आहे.
या कायद्यानुसार, मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी संबंधित व्यक्तीचा त्या मतदार प्रभागात नेहमीचा व प्रत्यक्ष रहिवास असणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीची त्या प्रभागात मालमत्ता असली, पण ती स्वतः तेथे राहत नसेल आणि सदर मालमत्ता भाड्याने दिली असेल, तर अशा मालकाला त्या प्रभागातून मतदान करता येत नाही. निवडणूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भाड्याने राहणारा नागरिक जर त्या पत्त्यावर वास्तव्यास असेल, तर तो मतदार म्हणून नोंदणीस पात्र ठरतो. तसेच कायद्यानुसार एका व्यक्तीला एकाच ठिकाणी मतदानाचा अधिकार असून, दोन मतदार यादींमध्ये नाव नोंदवणे बेकायदेशीर आहे. तथापि, जर घरमालक स्वतः त्या पत्त्यावर राहत असेल आणि घराचा काही भाग भाड्याने दिला असेल, तर अशा परिस्थितीत मालकाचा मतदानाचा हक्क कायम राहतो.

Scroll to Top