गिगाप्लेक्स, ऐरोली येथे मोबाईल नेटवर्कचा गंभीर प्रश्न; कामगार त्रस्त

®अधिवेशन वृत्तसेवा, ऐरोली : नवी मुंबईतील Gigaplex Airoli Knowledge Park परिसरात मोबाईल नेटवर्क समस्येमुळे कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः Vodafone Idea (वोडाफोन) आणि Reliance Jio (जिओ) या कंपन्यांचे नेटवर्क उपलब्ध नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. कामगारांच्या म्हणण्यानुसार, नेटवर्क नसल्यामुळे त्यांना दैनंदिन कामकाजात अडथळे येत असून, कुटुंबीयांशी संपर्क साधणेही कठीण होत आहे. यामुळे मानसिक तणाव आणि अस्वस्थता वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन मोबाईल नेटवर्क कंपन्यांना आवश्यक त्या सूचना देऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर हस्तक्षेप करून नेटवर्क समस्या सोडवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Scroll to Top