
®अधिवेशन वृतसेवा,उल्हासनगर : वर्तमानपत्र वाचनामुळे समाजात सकारात्मक विचारांची रुजवणूक होते, असे प्रतिपादन व.पो.नि. कन्ह्यालाल थोरात यांनी केले. ते वर्तमानपत्र वाचनाचे महत्त्व सांगताना बोलत होते.थोरात यांनी सांगितले की, वर्तमानपत्र हे केवळ बातम्यांचे माध्यम नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. वर्तमान घडामोडी, सामाजिक प्रश्न, शैक्षणिक विषय तसेच देश-विदेशातील घडामोडींची माहिती वर्तमानपत्रातून मिळते. त्यामुळे वाचकांची विचारसरणी व्यापक व सकारात्मक होते.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल व सोशल मीडियाचा वापर वाढला असला, तरी वर्तमानपत्र वाचनाची सवय टिकवणे अत्यंत गरजेचे आहे. वर्तमानपत्रामुळे तथ्यपूर्ण माहिती मिळते आणि अफवांपासून दूर राहता येते, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी युवकांना नियमित वर्तमानपत्र वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले. वर्तमानपत्र वाचनामुळे व्यक्तिमत्त्व विकास, भाषेची समृद्धी आणि सामाजिक जाणीव वाढते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.