संकटसमयी तात्काळ मदतीसाठी पोलीस सज्ज; उल्हासनगर सेंट्रल पोलीस स्टेशनबाहेर जनजागृती बॅनर

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : उल्हासनगर परिमंडळ क्रमांक ४ च्या हद्दीत राहणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग व्यक्तींना संकटसमयी तात्काळ मदत उपलब्ध व्हावी, या उदात्त हेतूने उल्हासनगर सेंट्रल पोलीस स्टेशनच्या बाहेर जनजागृतीपर बॅनर लावण्यात आला आहे.
या बॅनरद्वारे “प्रत्येक स्त्रीचा विश्वास – महाराष्ट्र पोलीस” हा संदेश देण्यात आला असून, महाराष्ट्र पोलिसांचा आपत्कालीन सुरक्षा क्रमांक 112 सर्वांसाठी सदैव कार्यरत असल्याची माहिती नागरिकांना देण्यात आली आहे. महिला व बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही संशयास्पद घटना अथवा गुन्हा निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन या बॅनरमधून करण्यात आले आहे.
महिला व बालकांसाठी असलेली आपत्कालीन सुरक्षा सेवा २४ तास उपलब्ध असून, मदतीसाठी खालील हेल्पलाईन क्रमांक दिले आहेत — 8976004111, 8850200600, 022-45161635.
या उपक्रमामुळे परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींमध्ये सुरक्षेची भावना अधिक बळकट झाली असून, संकटसमयी पोलिस मदत तत्काळ मिळू शकते, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

Scroll to Top