तात्काळ नागरिक सेवा देणारे सुभाष जाधव जनतेचे विश्वासू कर्मचारी

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : उपविभागीय अधिकारी कार्यालय, उल्हासनगर येथे लिपिक पदावर कार्यरत असलेले श्री. सुभाष जाधव हे आपल्या प्रामाणिक आणि कार्यतत्पर सेवेमुळे नागरिकांमध्ये एक विश्वासार्ह नाव ठरले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी शासकीय सेवेत निष्ठा आणि पारदर्शकतेने काम करत जनतेला तात्काळ व अचूक सेवा पुरवण्याचे कार्य केले आहे.
नागरिकांची कामे वेळेत पार पडावी यासाठी ते सदैव तत्पर असतात. कार्यालयीन वेळेतच नव्हे तर अतिरिक्त वेळ देऊनही त्यांनी अनेक नागरिकांची मदत केली आहे. त्यांचा सकारात्मक आणि मनमिळावू स्वभाव हा सहकाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये विशेष उल्लेखनीय ठरतो.
अशा सेवाभावी कर्मचाऱ्यांमुळेच शासकीय यंत्रणेबद्दल लोकांचा विश्वास टिकून राहतो. सुभाष जाधव यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा आणि त्यांची अशीच सेवा जनतेस लाभत राहो, हीच सदिच्छा व्यक्त करण्यात येत आहे.

Scroll to Top