उल्हासनगरमध्ये बोगस डॉक्टर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : बोगस डॉक्टरांच्या मुद्द्यावर पोलिसांनी गंभीर आरोप घातले आहेत. डॉ. चंदर रोहरा, डॉ. अरुण भाकरे, डॉ. सुरेश मुरलीधर पिलारे आणि श्रीकृण तुकाराम कुमावत यांच्यावर संगणमत करून बोगस डॉक्टर कुमावत याला वैद्यकीय व्यवसाय करण्यास मदत करण्याचा आरोप करण्यात आला आहे. श्री साई क्लिनिक, उल्हासनगर-४ येथील या प्रकरणात डॉ. चंदर रोहरा, डॉ. अरुण भाकरे आणि डॉ. सुरेश मुरलीधर पिलारे यांनी कुमावत याला कोरोना काळात बोगसपणे उपचार सुरू करण्यास प्रोत्साहित केले. कुमावत याच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याचे कोणतेही अधिकृत प्रमाणपत्र नव्हते. त्याच्या या कार्यामुळे अनेक रूग्णांना फसवले गेले आणि सरकारला देखील मोठे नुकसान झाले.
या प्रकरणात संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता, १८६० च्या कलम १८८, ४१९, ४२० आणि महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम, १९६१ च्या कलम ३३ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक एस. ए. गवळी करत आहेत.

Scroll to Top