
उल्हासनगर: २० जुलै – उल्हासनगर परिमंडळ 4 येथील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे नवीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून अशोक कोळी यांनी नुकतीच पदभार स्विकारला. त्यांच्या या नवीन नियुक्तीमुळे परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने सकारात्मक बदल होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अशोक कोळी हे पोलिस विभागात अनुभवी अधिकारी मानले जातात. त्यांनी यापूर्वी अनेक महत्त्वाच्या ठिकाणी जबाबदारी पार पाडत उल्लेखनीय सेवा दिली आहे. त्यांची निर्णयक्षमता, कठोर परिश्रम आणि नागरिकांशी सुसंवाद ठेवण्याची शैली यामुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी ‘ग्रामीण पोलीस’ पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “उल्हासनगर 4 परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर आळा घालणे आणि नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढवणे, हे माझे प्राथमिक उद्दिष्ट असेल. नागरिकांनी सहकार्य केल्यास एक सुरक्षित आणि शांततेचे वातावरण निर्माण करणे शक्य होईल.”
स्थानिक नागरिक आणि समाजिक कार्यकर्त्यांनी देखील त्यांच्या स्वागतासाठी पुढाकार घेतला असून, नव्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडून अधिक सक्रिय आणि पारदर्शक पोलिसी कारभाराची अपेक्षा व्यक्त केली आहे.