
®अधिवेशन वृतसेवा, ठाणे: ठाणे/पालघर सैनिक कल्याण कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या माजी सैनिक/माजी सैनिक विधवा, ज्यांचे पाल्य शैक्षणिक वर्ष 2024-2025 मध्ये शालांत (इ.10 वी) परिक्षेमध्ये 90% व उच्च माध्यमिक (इ.12 वी) परिक्षेमध्ये 85% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होवून शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये पुढील शिक्षण घेत आहेत व ज्यांचे पाल्य पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत किंवा ज्या माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांना IIT, IIM, AIIMS अशा नामवंत व ख्याती प्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळाला आहे, तसेच राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, नृत्य इ. क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर, जळीत, दरोडा, अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे तसेच देश/राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक/पत्नी/पाल्य इत्यादींना विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
अर्ज मिळण्याकरिता माजी सैनिकांनी स्वत:च्या ईमेलवरुन या कार्यालयाच्या zswo_thane@maharashtra.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क करावा.
तरी पात्रताधारक लाभार्थींनी गौरव पुरस्कार मिळण्याबाबतचे अर्ज दि.15 सप्टेंबर 2025 पर्यंत कार्यालयात सादर करावेत. तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयीन दूरध्वनी क्र.०२२-२५३४३१७४ /९९२००१६५८० वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे/पालघर मेजर प्रांजळ जाधव (निवृत्त) यांनी केले आहे.