अंबरनाथ मध्ये जुगार अड्ड्यांना ऊत

®अधिवेशन वृतसेवा, अंबरनाथ : काही दिवसांपूर्वी अंबरनाथ विमको नाका, संजय नगर येथील मोठ्या जुगार अड्डावर अंबरनाथ पोलिसांनी कारवाई करत तेथिल नागरिकांना सांगितले की आपण पोलिसांना माहिती देताच तात्काळ कारवाई केली जाईल. परंतु तात्काळ सर्व कारवाई होत असताना सुद्धा ‘बन्सी’ एवं ‘बबलू’ नामक व्यक्ती बिनदास्त पणे विविध ठिकाणी नवं नवीन जुगाराचे अड्डे चालवत आहे.
व त्याचे सध्या व्हिडिओ ही वायरल झाले आहे. त्यामुळे नागरीक यामुळे त्रासले असून अनेक युवा पिढी बरबाद होत आहे. यामुळे गुन्हेगारीस वाव मिळत आहे. व त्यामुळे पोलिसांनी किमान ह्या व्यक्तीच्या जुगार अड्ड्यांचा शोध घेत अड्ड्यांवर कायमस्वरूपी प्रतिबधात्मक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
आशा आहे की सदर बातमी अनुसार ‘बन्सी’ व ‘बबलू’ नामक मटका किंगवर उल्हासनगर परिमंडळ 4 चे उपायुक्त सचिन गोरे प्रतिबंधात्मक कारवाई करतील.

Scroll to Top