उल्हासनगर परिमंडळ 4 च्या हद्दीत हॉटेल, लॉजमध्ये खुलेआम वेश्याव्यवसाय अजूनही सुरूच

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : काही दिवसांपूर्वी कायदा सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी उल्हासनगरात पोलिसांचे ऑपरेशन ‘ऑल आऊट’ राबविण्यात आले होते. त्यामध्ये ९३ लॉज व बार तपासणी करण्यात आले होते. एवढे सर्व असतांना बिनदास्त पणे उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ‘सीतारा/ओंमकार लॉजिग अँड बोर्डिंग’ आणि कोहिनुर या दोन्ही लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची पुन्हा एकदा माहिती समोर आली आहे. या लॉजमध्ये यापूर्वीही विविध गुन्हे नोंदवले गेले आहेत, परंतु संबंधित मालक आणि मॅनेजर यांनी “आम्ही सर्वांना सेक्शन देतो, आमचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही” असा दावा करत राजरोसपणे वेश्याव्यवसाय सुरू ठेवला आहे.
मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर, अनेक स्थानिक वृत्तपत्रात बातमी आली असताना संबंधित लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरूच आहे. या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने कायदेशीर कारवाई करून पिडीत महिलांची सुटका करावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे.

Scroll to Top