तक्रार तुमची; टाळाटाळ आमची – सचिन शालिनी पांडुरंग गोरे, पोलीस उपायुक्त, उल्हासनगर परिमंडळ 4

अंबरनाथ : शहरात सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सचोटीने व पराकाष्ठाने प्रयत्न करून समाजातील प्रत्येक घटकाचे मदतीने सामाजिक आणि जातीय सलोखा वृद्धिगत करून गुन्हेगार, गुंड व संघटित गुन्हेगारी, समाज विघातक प्रवृत्ती, तसेच अवैध धंदे करणारे यांच्या विरुद्ध तत्परतेने कारवाई करू अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारां विरुद्ध कठोर प्रतिबंध कारवाई करू याकरीता सातत्याने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष ठोबरे प्रयत्नशील असताना दुसरी कडे उल्हासनगर परिमंडळ 4 मध्ये विविध ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याचे व्हिडीओ तसेच संबधित बातम्या प्रकाशित झाल्या असतांना “बातमी तुमची टाळाटाळ आमची” अशी ठाम भूमिका उल्हासनगर पोलीस उपायुक्त सचिन गोरे, यांची असल्याने बिनदास पणे स्थानिक पोलिस परवागीने अंबरनाथ मध्ये निवडणूकीच्या तोंडावर खुलेआम ‘बनसी’ व ‘बबलू’ नामक व्यक्तीचे नावे अवैध धंदे सुरू आहेत. यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त असून गुन्हेगारीला वाव मिळत असून परिमंडळ 4 मध्ये दिवसेंदिवस विविध गुन्ह्यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे अशा अवैध धंदे कायमस्वरूपी बंद कधी होतील याची जनता वाट पहात आहे.