
®अधिवेशन वृत्तसेवा, ऐरोली : दिघागावं रेलवे स्टेशन रोड, विशेषतः माइंडस्पेस ऐरोली वेस्ट, एमआयडीसी, प्लॉट क्रमांक १ आय.टी.५, नॉलेज पार्क रोड, टीटीसी इंडस्ट्रियल एरियातील रस्त्यावर गतिरोधक (स्पीड ब्रेकर) तसेच झेब्रा क्रॉससिंग, दिशा-निर्देश बोर्ड नसल्याने तेथील रहिवाशी आणि कामगार हे आपला जीव मुठीत घेऊन रस्ता ओलाडत आहेत त्यांच्या मते, येथील रस्त्यावर स्पीड ब्रेकर (गतिरोधक), झेब्रा क्रॉसिंग आणि पादचारी मार्ग दाखवणारी दिशा-बोर्ड्स नसल्यामुळे रस्ता पार करणे अत्यंत धोकादायक झाले आहे.
कामगार महिलांपासून ते वयोवृद्ध नागरिकांपर्यंत अनेक लोकांकरिता वाहनांचा जलद वेग एक धोका बनतो आहे. “स्पीड ब्रेकर नसेल तर वाहनाची गती कमी होत नाही आणि अपघात होण्याची शक्यता वाढते,” असा त्यांच्या तक्रारीत दावा आहे. त्याचबरोबर, झेब्रा क्रॉसिंग नसल्यामुळे पादचारी, विशेषतः मुलं आणि जेष्ठ नागरिक सुरक्षिततेने रस्ता पार करू शकत नाहीत.
तेथील रहिवाशांनी आणि कामगारानी प्रशासनाकडे त्वरित कार्यवाहीची मागणी केली आहे. त्यांनी सुचवले आहे की योग्य ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवावा, पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंग तयार करावी आणि दिशा-सूचना देणारे बोर्ड लावले जावेत.
रस्ते सुरक्षिततेचे तज्ज्ञ हे म्हणतात की झेब्रा क्रॉसिंग व गतिरोधक हा संयोजन रस्ता वाहतूक नियंत्रित करण्यात आणि अपघाताचा धोका कमी करण्यात अत्यंत प्रभावी आहे.
तेथील कामगार आणि रहिवासी यांचा असा दावा आहे की या सुधारणा करण्यात आल्या तर परिसरात रहिवाशांचे आणि कामगारांचे जीवन अधिक सुरक्षित होईल, आणि रस्ते वापर अधिक नियमित व शिस्तबद्ध होईल.