
®अधिवेशन पब्लिकेशन, उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील महानगरपालिकेच्या कचरा संकलन गाड्या नागरिकांच्या जीवाला धोका ठरत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकदा ब्रेक फेल होणे, वाहनांचा भरधाव वेग, अरुंद व खराब रस्ते यामुळे शहरात अपघातांच्या घटना वाढल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या चालूवर्षात कचरा गाड्यांच्या अचानक ब्रेक निकामी होणे किंवा नियंत्रण सुटल्याने अनेक वेळा वाहने, दुकाने आणि पादचाऱ्यांना धडक झाल्याच्या घटना नोंदल्या आहेत. काही प्रकरणांत लहान मुलांना आणि पादचाऱ्यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. याचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन सुरक्षिततेवर होत आहे.
शहरातील कोंदट आणि अरुंद रस्त्यांवर धोकादायक ड्रायव्हिंग; उल्हासनगरमधील रस्ते अत्यंत अरुंद, खड्ड्यांनी भरलेले व सांडपाण्याने ओले असल्याने वाहन चालवताना धोका अधिक वाढतो.
जाहिरात आणि बातमीसाठी आवश्यक संपर्क करा : 9322365100
- योग्य पादचारी मार्ग नाहीत.
- झेब्रा क्रॉसिंग नाही.
- वाहतुकीचे कार्यक्षम सिग्नल नाहीत.
- पार्किंग बोर्ड व लेन मार्किंगचा अभाव.
- स्पीड ब्रेकर नसल्याने गाड्यांचा भरधाव वेग या सगळ्यामुळे कचरा वाहने आणि इतर चारचाकी/दुचाकी यांच्यात वारंवार धोकादायक परिस्थिती निर्माण होते.
वाहते सांडपाण्यामुळे अपघाताचा धोका दुपटीने वाढला; शहरातील अनेक रस्त्यांवर सांडपाणी सतत वाहते, त्यामुळे रस्ते घसरडे होतात. विशेषतः सकाळच्या कचरा संकलन वेळेत घसरड्या रस्त्यांमुळे गाड्यांचे नियंत्रण सुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की, “सांडपाणी + वेग + अरुंद रस्ता = अपघात निश्चित” असा समीकरणच उल्हासनगरमध्ये तयार झाले आहे.
नागरिकांमध्ये वाढता आक्रोश; रोजच्या धोकादायक कचरा गाड्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून सुरक्षित कचरा संकलन व्यवस्था लागू करण्याची मागणी वाढत आहे. नागरिकांचे म्हणणे “कचरा संकलन महत्वाचे आहे, पण ते जीवघेणे नसावे. शहरातील शेकडो लोक दररोज भीतीने रस्त्यावरून जातात.
पालिका प्रशासनाकडे तातडीच्या सुधारणा मागणी; नागरिक आणि सामाजिक संस्थांकडून महापालिकेला खालील मागण्या करण्यात आल्या आहेत — 1. कचरा गाड्यांची टेक्निकल तपासणी नियमित करावी. 2. वेगनियंत्रण आणि प्रशिक्षण देणे बंधनकारक करावे. 3. सर्व रस्त्यांवर स्पीड ब्रेकर, सिग्नल आणि झेब्रा क्रॉसिंगची तातडीची व्यवस्था. 4. सांडपाणी वाहणाऱ्या रस्त्यांचे दुरुस्तीकरण. 5. पार्किंगची शिस्त लावून रस्ते मोकळे करणे.