
®अधिवेशन पब्लिकेशन, उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील कॅम्प १ ते ५ मधील गली-बोळ आणि वाहतूक रस्त्यांवर स्ट्रीटलाइट नसल्यामुळे नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी दिवे पूर्णपणे बंद असून काही ठिकाणी दिवे अस्तित्वातच नाहीत, त्यामुळे परिसर रात्रीच्या वेळी काळोखात बुडून जातो. अंधारामुळे अपघातांची शक्यता वाढली असून, विशेषतः महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
रोजच्या प्रवासात पादचारी, विद्यार्थी आणि रात्री उशिरा घरी परतणाऱ्या नोकरदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
स्थानिक रहिवाशांनी तक्रार केली की — “रस्त्यावर अंधार असल्यामुळे चोरी, लुटमार आणि प्रकारांना वाव मिळतो. गली-बोळात प्रकाश नसल्याने भीती कायम असते.” आशा आहे सदर बातमीची पालिका दखल घेईल.