
®अधिवेशन पब्लिकेशन, उल्हासनगर : भारत सरकारच्या प्रेस नोंदणी महाप्रतिनिधी (Press Registrar General of India) कार्यालयाने सल्ला क्रमांक 46/2025 जारी करून देशातील सर्व वृत्तपत्रे व नियतकालिकांच्या प्रकाशकांना प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पीरियॉडिकल्स Act, 2023 अंतर्गत असलेल्या इम्प्रिंट लाईन संबंधीच्या बंधनांची आठवण करून दिली आहे. अधिनियमाच्या कलम 4(2) नुसार भारतात छापल्या जाणाऱ्या प्रत्येक नियतकालिकाने खालील माहिती स्पष्टपणे नमूद करणे अनिवार्य आहे.
• मुद्रकाचे नाव
• छपाईचे ठिकाण
• संपादकाचे नाव
• प्रकाशकाचे नाव
• प्रकाशनाचे ठिकाण
प्रकाशनांमध्ये एकसमानता राखण्यासाठी, कार्यालयाने सुचवलेला इम्प्रिंट लाईनचा नमुना खालीलप्रमाणे आहे.
“हे वृत्तपत्र/नियतकालिक [प्रकाशकाचे नाव] यांचेद्वारे [प्रकाशनाच्या ठिकाणाचा संपूर्ण पत्ता] येथून [मालकाचे नाव] यांच्या वतीने प्रकाशित केले जाते, [संपादकाचे नाव] यांनी संपादित केलेले असून [मुद्रकाचे नाव] यांनी [छपाई यंत्राचे नाव व संपूर्ण पत्ता] येथे छापले आहे.”
“This newspaper/periodical is published by [Name of Publisher] from [complete address of the place of publication] on behalf of [Name of the Owner], edited by [Name of the Editor] and printed by [Name of the Printer] at [Name and complete address of the printing press] .”
प्रकाशकांनी आपली विद्यमान इम्प्रिंट लाईन तपासून वरील नमुन्याशी जुळणारे आवश्यक बदल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही अधिसूचना प्रेस नोंदणी महाप्रतिनिधी यांच्या मंजुरीने जारी करण्यात आली आहे, असे उपप्रेस नोंदणी महाप्रतिनिधी (राजीथ चंद्रन एम. आर.) यांनी ऑनलाइन पत्रांनुसार कळविले आहे. ★★★